Maharashtra Assembly Election 2024|| महाराष्ट्र विधानसभा २०२४ || सर्वाधिक मतांनी विजयी झालेले १० उमेदवार.

जाणून घ्या महाराष्ट्र विधानसभा २०२४ मध्ये सर्वाधिक मतांनी विजयी झालेले १० उमेदवार.

Mumbai: नुकतीच महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक २०२४ पार पडली. या निवडणुकीमध्ये दोन प्रमुख आघाड्या व काही इतर छोटे पक्ष आपल नशीब आजमावत होते. महायुतीमध्ये भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस या प्रमुख पक्षांसोबत इतर काही घटक पक्ष होते; तर महाविकास आघाडीमध्ये कॉंग्रेस, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) व राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार ) या प्रमुख पक्षांसोबत इतर काही घटक पक्ष होते. महायुतीने २३६ जागा मिळवत विजय मिळवला आहे; तर महाविकास आघाडीला फक्त ४७ जागाच मिळवता आल्या आहेत. या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळत विजय मिळवला आहे. आज पर्यंत अजित पवार हे महाराष्ट्रातील सर्वाधिक मताधिक्य मिळवणारे आमदार म्हणून ओळखले जायचे तर जाणून घेऊयात या निवडणुकीमध्ये सर्वाधिक मतांनी निवडून आलेले 10 आमदार कोण आहेत ?

१. शिवेंद्रराजे भोसले: महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी निवडून आलेल्या आमदारांच्या यादीत शिवेंद्रराजे भोसले यांचा पहिला क्रमांक लागतो. ते भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत. भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर सातारा विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. त्यांना एकूण 176,849 इतके मतदान झाले आह; त्यापैकी तब्बल 142124 मतांनी ते विजयी झाले आहेत.

२.धनंजय मुंडे: महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी निवडून आलेले आमदारांच्या यादीत धनंजय मुंडे यांचा दुसरा क्रमांक लागतो. ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर परळी विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. त्यांना एकूण 194889 इतके मतदान झाले आहे; त्यापैकी तब्बल 140224 मतांनी हे विजयी झाले आहेत.

३.दिलीप बोरसे: महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी निवडून आलेल्या आमदारांच्या यादीत दिलीप बोरसे यांचा तिसरा क्रमांक लागतो. ते भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत. भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर बागलन विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. त्यांना एकूण 159681 इतके मतदान झाले आहे; त्यापैकी तब्बल 129297 मताने ते विजयी झाले आहेत.

४.एकनाथ शिंदे: महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी निवडून आलेले आमदारांच्या यादीत एकनाथ शिंदे यांचा चौथा क्रमांक लागतो. जे शिवसेना पक्षाचे उमेदवार आहेत. शिवसेना पक्षाच्या तिकिटावर कोपरी पाच पाखाडी विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. ज्यांना 159060 इतके मतदान झाले आहे; त्यापैकी तब्बल 120717 मताने ते विजयी झाले आहेत.

५.चंद्रकांत पाटील: महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी निवडून आलेले आमदारांच्या यादीत चंद्रकांत पाटील यांचा पाचवा क्रमांक लागतो. ते भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत. भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर कोथरूड विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. त्यांना एकूण 129234 इतके मतदान झाले आहे त्यापैकी; तब्बल 112041 मतांनी ते विजयी झाले आहेत.

Maharashtra Assembly Election 2024 || सर्वाधिक मतांनी विजयी झालेले १० उमेदवार
Maharashtra Assembly Election 2024 || सर्वाधिक मतांनी विजयी झालेले १० उमेदवार

६. प्रताप सरनाईक: महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी निवडून आलेल्या आमदारांच्या यादीत प्रताप सरनाईक यांचा सहावा क्रमांक लागतो. ते शिंदे गट शिवसेना पक्षाचे उमेदवार आहेत. शिवसेना पक्षाच्या तिकिटावर ओवळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. त्यांना एकूण 184178 इतके मतदान झाले आहे; त्यापैकी तब्बल 108158 मतांनी ते विजयी झाले आहेत.

७. सुनील शेळके: महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी निवडून आलेले आमदारांच्या यादीत सुनील शेळके यांचा सातवा क्रमांक लागतो. ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तिकिटावर मावळ विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत त्यांना एकूण 191255 इतकी मतदान झाले आहे; त्यापैकी तब्बल 108565 मताने ते विजयी झाले आहेत.

८. शंकर जगताप: महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी निवडून आलेले आमदारांच्या यादीत शंकर जगताप यांचा आठवा क्रमांक लागतो. ते भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत. भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर चिंचवड विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. त्यांना एकूण 235323 इतके मतदान झाले आहे; त्यापैकी तब्बल 103865 मताने ते विजयी झाले आहेत.

९. अजित पवार: महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी निवडून आलेले आमदारांच्या यादीत अजित पवार यांचा नववा क्रमांक लागतो. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तिकिटावर बारामती विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. त्यांना एकूण 181132 इतके मतदान झाले आहे; त्यापैकी तब्बल 100899 मतांनी ते विजयी झाले आहेत.

१०. दादा भुसे: महाराष्ट्र सर्वाधिक मतांनी निवडून आलेल्या आमदारांच्या यादीत दादा भुसे यांचा दहावा क्रमांक लागतो. ते शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत शिवसेना पक्षाच्या तिकिटावर मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आलेले आहेत. त्यांना एकूण 158284 इतके मतदान झाले आहे; त्यापैकी तब्बल 106606 मतांनी ते विजयी झाले आहेत.

तर हे आहेत महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये सर्वाधिक मतांनी निवडून आलेले १० उमेदवार.