Eknath Shinde Vs BJP Conflict: राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर महायुती सरकार येणार हे निश्चित झाले आहे. अशातच एकनाथ शिंदे आणि भाजप मधील संघर्ष याच्या चर्चा होताना दिसत आहेत. तर जाणून घेऊयात काय आहे यातील सत्यता.
Eknath Shinde Vs BJP Conflict: राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर महायुती सरकार येणार हे निश्चित झाले आहे. अशातच एकनाथ शिंदे आणि भाजप मधील संघर्ष ( Eknath Shinde Vs BJP Conflict) याच्या चर्चा होताना दिसत आहेत. मागच्या आठवड्याभरात घडलेल्या तीन घटना या एकनाथ शिंदे आणि भाजप मधील संघर्ष ( Eknath Shinde Vs BJP Conflict) अधोरेखित करणाऱ्या आहेत. पहिली घटना आहे ती 26 नोव्हेंबरची, निकालानंतर तीन दिवसांनी एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राजभवनात जात राज्यपालांकडे सुपूर्द केला. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या सोबत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार राजभवनात उपस्थित होते. पण राजभवनात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांना नजर देण्याचं टाळलं अशा माध्यमांमध्ये चर्चा रंगल्या होत्या.
दुसरी घटना दिल्लीतली होती; मुख्यमंत्री पद आणि खाते वाटपाच्या चर्चेसाठी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या भेटीसाठी गेले होते. यावेळी एक फोटो व्हायरल झाला यामध्ये एकनाथ शिंदे नाराज आहेत अशा चर्चा रंगल्याचे पाहायला मिळालं होत. तिसरी घटना एकनाथ शिंदे महायुतीची खाते वाटपा संदर्भात मुंबईत होणारी बैठक रद्द करत साताऱ्यातील आपल्या मुळगावी दरेगावला गेल्याचे 29 नोव्हेंबरला समोर आल. या तिन्ही घटनांमध्ये कॉमन पॉइंट आहे ते एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस. अर्थात भाजप विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीमध्ये तब्बल 132 जागांवर विजयी झाला असल्यामुळे राज्यात भाजपचा मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. यामध्ये जरी नाव घोषित झालं नसलं तरी देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे पुढचे मुख्यमंत्री असणार आहेत असं सांगण्यात येते. पण मागची अडीच वर्ष राज्याचे मुख्यमंत्रीपद सांभाळलेल्या एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्रीपदावरील दावा अजूनही कायम आहे. मुख्यमंत्रीपद जर मिळालं नाही तर किमान महत्त्वाचे खाते तरी मिळावेत असा शिंदेंचा दावाअसणार आहे. पण मुख्यमंत्रीपद सोडण्यास तयार नसल्याने यातूनच एकनाथ शिंदे आणि भाजप यामधील सुप्त संघर्षाला राज्यात सुरुवात झाली आहे का ? असा प्रश्न सध्या विचारला जातोय. या सगळ्यांमध्ये नेमक राज्यात काय घडतंय ? समजून घेऊयात.
सुरुवातीलाच उल्लेख केल्याप्रमाणे, आठवड्याभरात ज्या काही घटना घडल्या त्या घटनां नंतर एकनाथ शिंदे आणि भाजप मधील संघर्ष ( Eknath Shinde Vs BJP Conflict) दिसून आला. पण याला सुरुवात कुठेतरी जरांगे पाटलांच्या मराठा आंदोलनापासूनच झाली होती असं दिसतं, म्हणून जरांगे पाटील हे मराठा आरक्षणावर बोलताना नेहमी भाजप आणि देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करायचे. एकनाथ शिंदे मात्र त्यांच सॉफ्ट टार्गेट असायचे. मराठा विरुद्ध ओबीसी अशा संघर्षाची बीज आणि त्यातूनं एकनाथ शिंदे आणि भाजप मधील संघर्ष ( Eknath Shinde Vs BJP Conflict) सुरू झाला होता. या काळात एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते. ठाकरेंचं राजकारण संपवण्यासाठी भाजपनं शिंदेंना हाताशी धरून शिवसेनेत फुट पाडली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस तर शिंदेंच्या विरोधात काहीच करू शकले नाही. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वापर्यंत शिंदे विरुद्ध फडणवीस असा वाद कधीच उघडपणे समोर आल्याचा दिसलं नाही. पण विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर हा वाद उघडपणे लोकांसमोर पहिल्यांदाच येतोय. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 57 तर अजित दादांना 41 जागा मिळाल्या आहेत. भाजपच स्वबळावरच्या बहुमतापासुन फक्त 13 जागाच दूर आहे. अश्यातच अजित पवार गटाने भाजपला मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा देऊन टाकलाय. त्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री पदासाठीचा आणि सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपाला जर शिंदेंनी पाठिंबा दिला नाही तरी अजित पवार गटाच्या जोरावरती भाजपचा मुख्यमंत्री होईल हे निश्चित आहे आणि आपल्या सत्ता स्थापनेसाठी कसलाही अडसर राहणार नाही हे एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले असले तरी पण घोडं अडले ते खाते वाटपावरून. त्यातनच एकनाथ शिंदे आणि भाजप मधील संघर्ष ( Eknath Shinde Vs BJP Conflict) उघडपणे दिसू लागलाय असं म्हटलं जातंय.

एकनाथ शिंदे आणि भाजपच्या सुप्त संघर्षाला सुरुवात झाली असं म्हणायचं पहिलं कारण म्हणजे दोन्ही कडून असणारी मुख्यमंत्री पदाची आशा. भाजपाला शिंदे गटापेक्षा जास्त जागा मिळाल्या असतील पण निवडणुका लढल्या गेले त्या एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात. स्वतः भाजपचे केंद्रीय स्तरापासून ते राज्यस्तरापर्यंतचे नेते आपण शिंदेंच्या नेतृत्वात विधानसभा निवडणूक लढवत आहोत हे सातत्याने सांगत होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेलं घवघवीत यश हे एकनाथ शिंदे आपल्या नेतृत्वाचा यश मानताना दिसून येतं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि तसेच एकनाथ शिंदे मराठा चेहरा असल्यामुळे लोकांनी आपल्या चेहऱ्यावर मतं दिली असं एकनाथ शिंदे सोबतचे नेते बोलत असल्याचे दिसतात. माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री कोण होणार असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा बोलताना एक कॉमन मॅन म्हणून केलेल्या कामांमुळे मुख्यमंत्री मी व्हावे असे लोकांची भावना असणे साहजिकच आहे असं वक्तव्य एकनाथ शिंदेंनी केलं आणि जनतेच्या मनातला मुख्यमंत्री आपणच आहोत अस सांगण्याचा प्रयत्न केला.
दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपला भरघोस यश मिळाल्याने फडणवीस मुख्यमंत्री व्हावे हे भाजपच्या प्रत्येक नेत्याची, कार्यकर्त्याची इच्छा आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनी विधानसभा निवडणूक तुल्यबळ लढली पण विधानसभा निवडणुकीत भाजपला जास्त जागा मिळाल्या आणि शिंदेने मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडला असं म्हटलं जातं. आता शिंदे मुख्यमंत्री नाही तर किमान सरकार मधली महत्त्वाची खाती आपल्याला मिळावीत यासाठी आग्रही असल्याचे समजते आहे. या खात्यांमध्ये अगदी गृहमंत्री पद, अर्थमंत्री, नगर विकास मंत्री, कृषी मंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि विधानसभेचे अध्यक्ष पद या सगळ्याचा समावेश आहे; पण महत्त्वाची खाती शिंदेंना सोडायला भाजपचा नकार आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना गृहमंत्रालय फडणवीसांकडे होतं. भाजपचा मुख्यमंत्री झाल्यावर गृहमंत्री पद शिंदेंना देण्यात यावं असं शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांचा आग्रह आहे. भाजप गृह मंत्रालय सोडण्यासाठी नकार देत आहे; कारण गृहमंत्र्यांसारखं महत्त्वाचं पद शिंदे यांच्या शिवसेनेकडे गेलं तर शिंदे पुन्हा भाजपला डोईजड होतील असं भाजपचे मत आहे. पण शिंदे मुख्यमंत्री पदाच्या बदल्यात गृहमंत्री पदावर अडून बसले असल्याचे समजते. या सगळ्या मंत्री पदाच्या घडामोडीं मधून दिसून येतो तो एकनाथ शिंदे आणि भाजप मधील संघर्ष ( Eknath Shinde Vs BJP Conflict).
हे देखील वाचा महाराष्ट्र विधानसभा २०२४ संभाव्य मंत्रिमंडळ
एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये सुक्त संघर्षाला सुरुवात झाली असं म्हणण्याचं दुसरं कारण आहे महायुतीत अजित पवार आले नसते तर आमच्या 90 ते 100 जागा निवडून आल्या असत्या असा दावा शिंदेंच्या शिवसेनेच्या गुलाबराव पाटलांनी केला आहे. याआधी एकनाथ शिंदे यांच्या मनात काय चाललंय हे कोणीच सांगू शकत नाही असा दावा शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाठानी केला होता; तर एकनाथ शिंदे हे सत्तेच्या बाहेर राहतो असं म्हणत होते असा दावा भरत गोगावलेनी केला होता. महायुतीतले सगळे नेते काही दिवसांपूर्वी महायुतीला मिळालेल्या प्रचंड बहुमताचे स्वागत करत होते पण आज या नेत्यांना अचानक अजित पवारांची अडचण काय झाली आहे. सत्तेबाहेर राहण्याची भाषा का करायला लागले असा प्रश्न विचारला जातोय ? याचे उत्तर सोप आहे अजित दादांनी आपल्या 41 आमदारांचे बळ भाजपच्या पाठीमागे उभा केल्यानं शिंदेंच्या शिवसेनेची कोंडी झाली आहे. अजित पवार महायुतीत नसते तर भाजपला शिवसेनेची गरज मोठ्या प्रमाणात लागली असती आणि कदाचित शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री झाले असते. रामदास कदम यांनी म्हटल्याप्रमाणे अजित दादांनी शिंदे गटाची बार्गेनिंग पॉवर कमी केल्याचे दिसते. राज्याच्या राज्यकारणात विरोधी विचारधारेचे असूनही देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे मैत्रीपूर्ण सबंध दिसून आले आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि अजित दादा अर्थमंत्री असले तर हे दोघे शिंदे गटाला जड जातील याची भीती शिंदे यांच्या नेत्यांना वाटते आहे. तसेच शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेच्या निकालानंतर शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. फडणवीसांची अजित दादांसोबत असलेली जवळीक आणि शिंदे यांचे शरद पवार गटांसोबत असणारी जवळीक या सुक्त संघर्षाचे दुसरे कारण आहे असं आपल्याला म्हणता येईल.
एकनाथ शिंदे आणि भाजप मधील संघर्ष ( Eknath Shinde Vs BJP Conflict) सुरु झाला असं म्हणण्याचं तिसरं कारण म्हणजे त्यांचे नेते एकमेकांना शह कटशह देताना दिसतात. अमित शहांसोबत झालेल्या बैठकीत आपल्याला महत्त्वाचे खाते मिळणार नाहीत हे एकनाथ शिंदे यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी दुसऱ्या दिवशी दरेगावचा रस्ता धरला असं म्हटलं जाते. दोन दिवस मुक्कामी होते; तेव्हा एकनाथ शिंदे महायुतीने बाहेर पडतील का त्याच्या ही चर्चा झाल्या. आता महायुतीची बैठक टाळून शिंदे दरेगावला गेल्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाच डिसेंबरला महायुती सरकारचा शपथविधी होईल अस ट्विट करून सांगितलं. भाजपन एकनाथ शिंदेंना दिलेला हा अल्टिमेटम होता असं बोलल जात. दुसऱ्याच दिवशी शिंदे यांनी दरे गावात प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि महायुतीत समन्वय असल्याच सांगितलं. यानंतर एकनाथ शिंदे मुंबईला आले. त्यानंतर सोमवारी महायुतीच्या नेत्यांमध्ये बैठक होईल असं बोललं गेलं पण शिंदेंची तब्येत बरी नसल्याने पुन्हा एकदा महायुतीतली बैठक रद्द झाली आहे. भाजप आणि शिंदे गटात चालू असलेल्या सगळ्या घडामोडीत एक प्रश्न विचारला जातोय आणि तो म्हणजे एकनाथ शिंदे आणि भाजपचे नेते एकमेकांच्या समोर येण्याचं टाळत तर नाही ना. थोडक्यात सांगायचं तर मागच्या आठवड्यात एकनाथ शिंदे आणि भाजप मधील संघर्ष ( Eknath Shinde Vs BJP Conflict) सुरु झालाय असं बोललं जात आहे. 5 डिसेंबरला महायुती सरकारचा शपथविधी होणार आहे. अशा परिस्थितीत एकनाथ शिंदे आणि भाजप मधील संघर्ष ( Eknath Shinde Vs BJP Conflict) कोणत वळण घेतो हे पाहणं महत्त्वाचं असेल. या सगळ्या नाराजीच्या चर्चांमध्ये अजित दादांनी तर आता दिल्ली गाठली; त्यामुळे अजित दादा नेमका काय रोल प्ले करणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल.