maharashtra cabinet: महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीनंतर महायुती सरकार राज्यात स्थापन होणार आहे; तर जाणुन घेऊयात कोण कोणत्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी मिळू शकते.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०२४ मध्ये 235 जागांवर यश मिळवल्याने आता राज्यात महायुतीचा सत्ता स्थापना करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महायुतीमध्ये मुख्यमंत्री कोण असणार याच्या चर्चा जोरदार सुरू असून एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत मंगळवारी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. आता नवीन मुख्यमंत्री निवडे पर्यंत एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहणार आहेत. तेव्हापासुनच महायुतीतील तिन्ही पक्षांनी मुख्यमंत्री पदावर दावा करण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर तिन्ही पक्षांना मिळालेल्या यशानंतर मंत्रिपदासाठी उत्सुक असलेल्या नेत्यांच्या संख्येत देखील वाढ झाल्याचे बघायला मिळतं आहे. अनेक मतदारसंघांमध्ये तर आधीच जिंकलेल्या आमदारांचे भावी मंत्री म्हणून बॅनर देखील लागल्यास सुरुवात झाली आहे. विधानसभेच्या एकूण जागा 288 आहेत; यातील पंधरा टक्के म्हणजे 43 आमदारांना मंत्रिपद देणे शक्य असतं. मात्र भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) यातील नेमके कोणते नेते मंत्रीपदाच्या शर्यतीत आहे ? कोणत्या नवीन नावांचा या यादीत समावेश होऊ शकतो ? याची जोरदार चर्चा राज्यभर सुरु आहे.
सगळ्यात जास्त 132 जागा जिंकलेल्या असल्याने भाजपच्या पारड्यात सर्वाधिक मंत्रिपद पडणार यात काही शंका नाही. भाजपमध्ये मंत्रिपद मिळणार पहिल नाव अर्थातअसेल ते देवेंद्र फडणवीस यांच. देवेंद्र फडणवीस यांच नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असताना त्याच्या ताब्यात राज्याचे कंट्रोल असताना काही महत्त्वाचे खाते देखील देवेंद्र फडणवीस आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसू शकतात. त्यानंतर संभाव्य मंत्रिमंडळातील दुसर नाव आहे चंद्रशेखर बावनकुळे यांच. ते कामठी मतदार संघातुन विजयी झालेले असून त्यांच्याकडे ओबीसी नेतृत्व म्हणून पाहिले जात. चंद्रशेखर बावनकुळे हे कामठी मधून चौथ्यांदा विजय झाले असून ते विदर्भातून येतात तेव्हा भाजपकडून त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर संभाव्य मंत्रिमंडळातील पुढचं नाव आहे गिरीश महाजन यांचे. जामनेर मधून सलग सात वेळा विजय मिळवत हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात ठेवलेल्या गिरीश महाजनांनी याही वेळेला जामनेर मधून विजय मिळवला. आधीच्या सरकारमध्ये त्यांच्याकडे ग्रामविकास मंत्री पदाची जबाबदारी होती; त्यामुळे याही वेळेला त्यांची मंत्रिपदी वर्णी लागू शकते असं बोललं जातं आहे.
भाजपकडून संभाव्य मंत्रिमंडळातील पुढचं नाव आहे सुधीर मुनगंटीवार यांच. सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे चंद्रपूर, वर्धा जिल्ह्यातील दहापैकी नऊ जागांवर भाजपचे आमदार निवडून आले. यांचा देखील मंत्रिमंडळात समावेश असेल यात काही शंका नाही. त्यानंतर संभाव्य मंत्रिमंडळातील पुढचं नाव आहे चंद्रकांत पाटील यांचे. कोथरूड मधून दुसऱ्यांदा निवडून आलेले चंद्रकांत पाटील यांच्याकडे मागच्या सरकारमध्ये उच्च व तंत्र शिक्षण आणि महसूल यासारखी महत्त्वाची खाती होती. त्याचबरोबर अमित शहांच्या जवळचे म्हणून चंद्रकांत पाटलांना ओळखलं जातं. त्यामुळे याही वेळेला चंद्रकांत पाटील यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची चर्चा आहे. मागील सलग तीन टर्म वांद्रे पश्चिम मधून निवडून येणाऱ्या आशिष शेलार यांचे देखील नाव मंत्रिपदाच्या रेसमध्ये आहे. आशिष शेलार हे भाजपचे मुंबई शहर अध्यक्ष म्हणून काम पाहतात. याशिवाय भाजपचा मुंबईतील प्रभावी चेहरा आणि अमित शहांच्या जवळचा नेता अशी ओळख असल्याने आशिष शेलार यांना मंत्रिपद मिळण्याची चर्चा रंगली आहे.
संभाव्य मंत्रिमंडळातील पुढचं नाव आहे रवींद्र चव्हाण यांच. रवींद्र चव्हाण हे डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत ही त्यांची चौथी टर्म आहे. त्यामुळे सलग चार वेळा निवडून आल्याने यावेळी त्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडू शकते; याशिवाय ते देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे नेते म्हणून देखील ओळखले जातात. त्यानंतर संभाव्य मंत्रिमंडळातील पुढचं नाव आहे राहुल कुल यांच. राहुल कुल हे सलग तिसऱ्यांदा रमेश थोरात यांना पराभूत करून ते आमदार झाले आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघातील दौंड असा एकमेव मतदार संघ आहे जिथे एकदा ही मंत्रीपद देण्यात आलेल नाही. प्रचार सभेत राहुल कुल यांना मंत्रीपदाच आश्वासन दिलेले; त्यामुळे आश्वासन पूर्ण होतं का? याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.
संभाव्य मंत्रिमंडळातील पुढचं नाव आहे मंगल प्रभात लोढा यांच. मलबार हिल मतदार संघातून सातव्यांदा विजय मिळवणारे मंगल प्रभात लोढा मागच्या सरकारमध्ये देखील भाजपने मंत्री पद दिलं होत. राज्यात विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर आता भाजपचे लक्ष महानगरपालिका निवडणुकांवर आहे. अशावेळी मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी पुन्हा एकदा लोढा यांना मंत्रीपद दिलं जाऊ शकता असं बोललं जातं आहे. संभाव्य मंत्रिमंडळातील पुढचं नाव आहे संभाजी पाटील निलंगेकर यांच. निलंगा विधानसभा मतदारसंघातून संभाजी पाटील निलंगेकर सलगपणे दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. त्यांची आमदारकीची ही चौथी टर्म आहे. संभाजी पाटील निलंगेकर माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर यांचे नातू आहेत; त्याचबरोबर नितीन गडकरी हे जेव्हा निलंगेकर यांच्या प्रचार सभेसाठी निलंग्यात आले होते तेव्हा गडकरींनी निलंगेकर यांना मंत्रीपदी बसवण्याचा विश्वास देखील बोलून दाखवला होता त्यामुळे त्यांच्या देखील नावाची चर्चा सुरू आहे.
संभाव्य मंत्रिमंडळातील पुढचं नाव आहे गणेश नाईक यांचे. गणेश नाईक हे बेलापूर मधून चार वेळा तर ऐरोलीतील दोन वेळा निवडून आले आहेत. त्याचबरोबर यापूर्वी ते वेगवेगळ्या सरकारमध्ये चार वेळा मंत्री देखील राहिले आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपचा पक्षांतराचा इतिहास असला तरी देखील राजकीय अनुभवाच्या जोरावर त्यांना यावेळी मंत्रिपद दिले जाण्याची शक्यता आहे. संभाव्य मंत्रिमंडळातील पुढचं नाव आहे नितेश राणे यांच. नितेश राणे हे कणकवली विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. राज्यात एकनाथ शिंदे यांचे बंड झाल्यानंतर जेव्हा महायुती सरकार स्थापन झाले तेव्हाच नितेश राणे यांचे नाव मंत्रीपदाच्या रेसमध्ये होतं; मात्र त्यावेळी ते झालं नाही त्यामुळे यावेळी मंत्र पद मिळण्याची शक्यता आहे. संभाव्य मंत्रिमंडळातील पुढचं नाव आहे संजय कुटे यांच. जळगाव जामोद मतदारसंघातून संजय कुटे हे सलग चौथ्यांदा विजयी झाले आहेत. या आधी पण त्याचं नाव मंत्रिपदाच्या रेस मध्ये होत.
संभाव्य मंत्रिमंडळातील पुढचं नाव आहे शिवेंद्रराजे भोसले यांचे. शिवेंद्रराजे भोसले हे सातारा विधानसभा मतदारसंघातून सलग चार वेळा निवडून आले आहेत. त्यांच्या रूपाने भाजपला राज घराण्यातील नेतृत्व मिळाले. त्याचबरोबर राष्ट्रवादीकडून कायमच भाजपवर छत्रपतींच्या घराण्यावर अन्याय केल्याचे आरोप केले जातात अशावेळी शिवेंद्र राजेंना मंत्रीपद देऊन भाजपा आरोप पुसण्याचा प्रयत्न करताना दिसू शकते. भाजपमधून संभाव्य मंत्रिमंडळातील पुढचं नाव आहे माधुरी मिसाळ यांचे. माधुरी मिसाळ या सलग चौथ्यांदा पर्वती विधानसभेतून निवडून आल्या आहेत. त्याचबरोबर मागील सरकारमध्ये देखील त्यांना मंत्रिपद मिळण्याची चर्चा झाली होती; मात्र यावेळी महिला नेत्या म्हणून त्यांना मंत्रिपद देऊ शकत असं बोललं जातं आहे. पुढचं नाव आहे राणा जगजीत सिंह पाटील यांचे. ते तुळजापूर मतदार संघातुन मधून सलग दुसऱ्यांदा मोठ्या माताधिक्याने विजयी झाले आहेत. फडणवीस यांचे निकटवर्तीय असल्याने धाराशिव जिल्ह्यातून मंत्रीपदाच्या रेसमध्ये त्यांचे देखील नाव आहे. पुढचं नाव आहे ते म्हणजे गोपीचंद पडळकर यांचं. जत विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच विजयी झालेले गोपीचंद पडळकर हे धनगर समाजाचे नेते असल्याने त्यांना मंत्रिपद दिलं जाऊ शकत बोलल जात आहे.
हे देखील वाचा महाराष्ट्रातील सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेले १० उमेदवार
शिवसेनेतून मंत्रिपदाच्या रेसमध्ये असलेल पहिल नाव आहे ते म्हणजे अर्थात एकनाथ शिंदे. महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री राहिलेले शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदासोबतच इतर देखील काही महत्त्वाची मंत्रिपदे मिळू शकतात. त्यानंतरचं संभाव्य मंत्रिमंडळातील पुढचं नाव आहे शंभूराज देसाई यांचे पाटण मधून सलग तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. महाविकास आघाडीमध्ये त्यांना राज्यमंत्रीपद तर महायुतीत सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारी दिली होती. याही वेळेला त्यांना मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता आहे. संभाव्य मंत्रिमंडळातील पुढचं नाव आहे उदय सामंत यांचे. रत्नागिरीचा आपला गड शाबुत राखणारे उदय सामंत महायुती सरकारमध्ये उद्योग मंत्री होते. त्यामुळे याही वेळेला त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. संभाव्य मंत्रिमंडळातील पुढचं नाव आहे गुलाबराव पाटील यांच. गुलाबराव पाटील हे जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. 2019 मध्ये त्यांना महाविकास आघाडीमध्ये आणि त्यानंतर 2022 मध्ये महायुती सरकारच्या काळात मंत्री राहिले आहेत. याही वेळेला त्यांना मंत्रिपद मिळू शकत असं बोललं जात आहे.
पुढचं नाव आहे दादा भुसे यांच मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. 2014 ला भाजप- शिवसेना युती सरकारच्या काळात, 2019 ला महाविकास आघाडीच्या काळात आणि 2022 ला महायुती सरकारच्या काळात असे तीन वेळा मंत्री राहिलेत; त्यामुळे याही वेळेला दादा भुसे यांना डावलणार नाही अशी चर्चा आहे. संभाव्य मंत्रिमंडळातील पुढचं नाव आहे संजय राठोड यांच. दिग्रस विधानसभा मतदारसंघातून पाच वेळा निवडून येणारे संजय राठोड बंजारा समाजाच नेतृत्व करतात. ते महाविकास आघाडी आणि महायुती सरकारच्या काळात मंत्री राहिलेत; त्यामुळे त्यांची देखील पुन्हा मंत्रीपदी वर्णी लागू शकते. संभाव्य मंत्रिमंडळातील पुढचं नाव आहे प्रताप सरनाईक यांचं. प्रताप सरनाईक हे ओवळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा निवडून आले आहेत. ठाण्यातील बडे नेते म्हणून त्यांना ओळखल जात. महायुती सरकारमध्ये ते मंत्रिपदासाठी आग्रही होते मात्र त्यावेळी मंत्रीपद न मिळाल्याने यावेळी मात्र सरनाईक यांना मंत्री पद मिळेल अश्या चर्चा आहेत.
पुढचं नाव आहे भरत गोगावले यांचे. गोगावले महाड विधानसभा मतदारसंघातून चौथ्यांदा आमदार झाले आहेत. भरत भोगावले हे मागील दोन वर्पाषासून मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत; मात्र त्यावेळी त्यांना मंत्रिपद न मिळाल्याने नाराज होते यावेळी मात्र मंत्रीपदासाठी गोगावले आक्रमक झाल्याने त्यांना मंत्रिपद मिळू शकत. संजय शिरसाठ यांचे देखील नाव यावेळी चर्चेत आहे. संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातून चौथ्यांदा निवडून आले आहेत. राज्यात महायुती सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज होते. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी महायुतीने त्यांना सिडकोचा अध्यक्ष पद दिल होत; मात्र यावेळी त्यांची मंत्रिपदी वर्णी लागू शकते असं बोललं जात आहे.
शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीत अर्थात पहिला नाव आहे अजित पवार. मागच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री राहिलेल्या अजित पवार हे यावेळी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदावर दावा करू शकतात त्याचबरोबर अर्थ खात किंवा इतर काही महत्त्वाच्या खात्यांवर देखील अजित पवार दावा करू शकतात. संभाव्य मंत्रिमंडळातील पुढचं नाव आहे छगन भुजबळ यांच. ओबीसी समाजाचा नेतृत्व करणाऱ्या भुजबळांचा ओबीसी समाजावर विशेष प्रभाव आहे त्याचबरोबर या आधी ते गृहमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री राहिले आहेत. तेव्हा त्यांना देखील मंत्रीपद मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतरचं नाव आहे दिलीप वळसे पाटील. आंबेगाव मधून निवडून येणारे दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रवादीतील बडे नेते म्हणून ओळखले जातात. या आधी ते वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ऊर्जा, उत्पादन शुल्क व कामगार यासारख्या महत्त्वाच्या खात्याचे मंत्री राहिलेत. त्यामुळे यावेळी अजित पवारांकडून त्यांना मंत्रिपद दिले जाईल यात काही शंका नाही. पुढचं नाव आहे हसन मुश्रीफ. सलग सहाव्यांदा कागल मधून निवडून येणाऱ्या हसन मुश्रीफ यांचे देखील नाव मंत्री पदाच्या रेसमध्ये असू शकत. महायुती सरकारमध्ये देखील त्यांच्याकडे कॅबिनेट मंत्रीपद होतं महत्त्वाचं म्हणजे ते मुस्लिम समाजाच प्रतिनिधित्व करत असल्याने त्यांनी याही वेळेला मंत्रिपद मिळणार अशी चर्चा होत आहेत.
त्यानंतरच नाव आहे धनंजय मुंडे यांचे. विधानसभा निवडणुकीत विशेष चर्चेत असलेला मतदार संघ म्हणजे परळी. मुंडेंना पराभूत करण्यासाठी शरद पवारांनी लक्ष घातलं होतं मात्र तरी देखील धनंजय मुंडे 140224 मतांच्या फरकानं दुसऱ्यांदा आमदार झाले तर ते ओबीसी समाजातून असल्याने धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिपद मिळणार यात काही शंका नाही. त्यानंतरच नाव आहे अदिती तटकरे यांचे. या आधी देखील त्या मंत्री राहिल्या आहेत. सुनील तटकरे यांच्या त्या कन्या असून या यावेळी श्रीवर्धन मतदारसंघातून दुसऱ्यांदा विजय झाला आहे. अदिती तटकरे यांना मंत्रीपद देऊन अजित पवार महिलांना प्रतिनिधित्व देण्याचा मेसेज देऊ शकतात. संभाव्य मंत्रिमंडळातील पुढचं नाव आहे मकरंद पाटील यांच. सलग चौथ्यांना वाई विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले मकरंद पाटील हे देखील मंत्रिपदाच्या रेस मध्ये आहेत. त्याच महत्त्वाचं कारण म्हणजे महायुतीला राज्यात विजय मिळाल्यानंतर अजित पवार जेव्हा प्रीती संगमावर अभिवादन करण्यासाठी गेले होते; तर माध्यमांशी बोलताना त्यांनी साताऱ्याला मंत्रिपद देण्याविषयीच भाष्य केलं होतं. मुख्य म्हणजे यावेळी मकरंद पाटील देखील उपस्थित होते.
त्यानंतर पुढचं नाव आहे संजय बनसोडे. उदगीर विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून आलेले संजय बनसोडे हे अजित पोरांचे निष्ठावान म्हणून ओळखले जातात; त्यामुळे त्यांना महाविकासआघाडी सरकारच्या काळात आणि त्यानंतर राष्ट्रवादीतील बंडानंतर महायुती सरकारच्या काळात देखील मंत्रीपद मिळाल होत. राष्ट्रवादीत मंत्री पदासाठी चर्चेत असलेल्या शेवटचं नाव आहे सुनील शेळके यांच. बंडखोरांच्या आव्हानानंतर देखील सुनील शेळके हे मावळ विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून आलेत. महत्त्वाचं म्हणजे सुनील शेळके हे अजित पवारांचे जवळचे नेते म्हणून ओळखले जातात; त्याच जोरावर यंदा मावळ मधून सुनील शेळके यांच्या मंत्रिपदाची जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. तर हे होते महायुतीतले संभाव्य मंत्री आता त्यातील किती आमदारांच्या गळ्यात खरंच मंत्रिपदाची माळ पडणार आणि किती आमदारांना भावी मंत्री रहावे लागणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.